Harbhara Bajar Bhav : आजचे हरभरा बाजार भाव

Harbhara Bajar Bhav

काढणीचा हंगाम जोरात सुरु असून, बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची चांगली आवक दिसून येत आहे. आज अकोला येथील बाजार समितीत काबुली हरभऱ्याला विक्रमी कमाल 12000 ते किमान 7100 तर सरासरी 9400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर सामान्य लाल हरभऱ्याला कमाल 6690 ते किमान 5600 रुपये तर सरासरी 6250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अर्थात जानेवारी महिन्याच्या शेवटी 6 हजारांच्या आत रेंगाळणारे हरभऱ्याचे दर (Harbhara Bajar Bhav) सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कमाल 6000 रुपयांच्या वरती पोहचले आहेत.

 

आजचे हरभरा बाजारभाव 

 

Harbhara Bajar Bhav

जळगाव बाजार समितीत काबुली हरभऱ्याची (Harbhara Bajar Bhav) 2 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 700 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याव्यतिरिक्त पुढील सर्व बाजार समित्यांमध्ये लाल हरभऱ्याची आवक झाली आहे.

सोलापूर बाजार समितीत 232 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6750 ते किमान 6100 रुपये तर सरासरी 6400 रुपये प्रति क्विंटल,

अक्कलकोट (सोलापूर) बाजार समितीत 315 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7351 ते किमान 6700 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल,

तुळजापूर (धाराशिव) बाजार समितीत 70 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6300 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6200 रुपये प्रति क्विंटल,

आंबेजोबाई (बीड) बाजार समितीत 33 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6480 ते किमान 6361 रुपये तर सरासरी 6400 रुपये प्रति क्विंटल,

मुरुम (धाराशिव) बाजार समितीत 501 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6980 ते किमान 5301 रुपये तर सरासरी 6161 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

Harbhara Bajar Bhav

 

नागपूर बाजार समितीत 336 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6220 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5915 रुपये प्रति क्विंटल,

नांदगाव (नाशिक) बाजार समितीत 6 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6674 ते किमान 4100 रुपये तर सरासरी 5301 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा (सोलापूर) बाजार समितीत 249 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6400 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6250 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत 1714 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8500 ते किमान 4400 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत 40 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हरभरा काढणीसाठी लगबग सुरु

Lakhpati Didi Yojana काय आहे ? कसे मिळणार फायदे, जाणून घ्या सर्व काही.

 

Harbhara Bajar Bhav

राज्यातच नाही तर देशभरात जानेवारी अखेरनंतर हरभरा दरात (Harbhara Bajar Bhav) मोठी सुधारणा झाली आहे.

यावर्षी पावसाअभावी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या काही प्रमाणात हरभरा दर वाढलेले पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यातील शेतकऱ्यांची हरभरा काढणीसाठी लगबग सुरु असून, दरवाढ देखील झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हरभरा विक्री करता येणे शक्य आहे. कारण आगामी काळात उत्पादन कमी राहिल्यास नक्कीच भाववाढ होईल. मात्र सध्याच्या दरापेक्षा हरभरा भाव कमी झाल्यास फटका बसू शकतो. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा कल हा काढणीनंतर तात्काळ विक्री करण्यासाठी असणार आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *