KUNBI NONDI :
कुणबी नोंद तपासा तुमच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटात, इथे तपासा सर्व जिल्ह्यांची यादी..
KUNBI NONDI :
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती घेऊन आलेलो आहोत कुणबी पत्र मध्ये तुमचे नाव आहे का हे तुम्ही कशा पद्धतीने बघू शकतात अनेक व्यक्तींचे नावे पूर्वी कुणबी नोंद म्हणून होते आशा लाभार्थ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे मित्रांनो तुमच्या गावांमधून कोणकोणत्या लाभार्थ्यांचे नावे कुणबी नोंद म्हणून पूर्वी आहेत तुमचं नाव कुणबी नोंद म्हणून आहे का जर असेल तरच तुम्हाला प्रमाणपत्र कुणबी म्हणून दिला जाणार आहे मित्रांनो त्यासाठी अवघ्या दोन मिनिटाच्या आत सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये चेक करून घ्या तुमचं नाव कुणबी नोंद म्हणून आहे का तुमच्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांची नावे आहे दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने बघता येणार आहोत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो कुणबी नोंद कशी तपासायची यासाठी आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
येथे क्लिक करा
KUNBI NONDI :
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचं आधी सरकारने सांगितलं होतं, मात्र नंतर जरांगेंच्या वाशीच्या सभेत हा आकडा ५७ लाख असून त्यातल्या ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलं आहे अशी माहिती सरकारने दिल्याचं जरांगेंनी सांगितलं…त्यामुळे नोंद असणाऱ्यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मागे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद आढळल्याची बातमी आली होती. बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात ही नोंद आढळलेली.. या नोंदीमुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतयं.. गावागावांतल्या कुणबी नोंदीचे कागद आता समोर येतायत..पण तुमची कुणबी नोंद सापडली तर पुढे काय करायचं ? कुणबी नोंद आढळल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि कुणबी नोंद आढळूनही प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर पुढचा पर्याय काय असेल? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत..