Mahavitaran : खाजगी कामात सहभाग आढळल्यास महावितरणच्या कर्मचा-यांवर कारवाई होणार….
Mahavitaran :
म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी असून पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (“एमएसईबी”) त्रिभाजनानंतर कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत स्थापन केली गेली आहे. वीजनिर्मिती, पारेषण, वितरण आणि व्यापार या क्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे किंवा यापैकी कोणत्याही किंवा सर्व क्रियाकलापांमध्ये गुंतवणूक करणे हे कंपनीचे मुख्य उद्दीष्ट आहे.
ही कंपनी महाराष्ट्र राज्यातील ऊर्जा क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मर्यादित या त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांची सूत्रधारी कंपनी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना वीज (पुरवठा) अधिनियम, १९४८ च्या कलम ५ अंतर्गत २० जून, १९६० रोजी करण्यात आली. १९९८ मध्ये ही राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारी युटिलिटी होती.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पूर्ववर्ती बॉम्बे इलेक्ट्रिसिटी बोर्ड होते जे ६ नोव्हेंबर, १९५४ रोजी स्थापन झाले आणि ३१ मार्च, १९५७ पर्यंत कार्यरत होते, जेव्हा त्याचे नाव बदलून १९ जून, १९६० पर्यंत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असे करण्यात आले.
Mahavitaran :
महावितरणच्या कर्मचा-यांनी या पुढील काळात खाजगी बेकायदेशीर कामात सहभाग घेतला तर त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.Mahavitaran : बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती, सातारा, सोलापूर, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना या बाबत एका पत्राद्वारे इशारा दिला आहे.
या पत्रात पावडे यांनी नमूद केले आहे की, असे निदर्शनास आले आहे की, शाखा व उपविभागीय कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकारी कंपनीच्या नियमाविरुध्द खाजगी पध्दतीने नवीन वीजपुरवठा करवून देण्याचे काम, वीजवाहिनी स्थलांतरीत करण्याचे, त्यांच्या मंजूरी व अंदाजपत्रकांचे काम आपल्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी करतात.
कंपनीच्या सेवा नियम 86(3) अंतर्गत अ.क्र. (26) नुसार कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करणे किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यापार करणे किंवा व्यवसायात गुंतलेले असणे किंवा कंपनीच्या सेवेत असताना कोणत्याही प्रकारे भागीदारीत भाग घेणे हे नियमबाहय असून हा दंडनीय गुन्हा सुध्दा आहे. तसेच यामुळे कंपनीच्या कार्यालयीन वेळेचा अपव्यय व दुरुपयोग होतो आहे.
त्यामुळे अशाप्रकारे नवीन वीजपुरवठ्याचे काम, वीज वाहिनी स्थलांतरीत करण्याची, मंजूरी व अंदाजपत्रकांचे काम इत्यादी प्रकारचे कुठलेही काम हातात घेणे किंवा अशाप्रकारच्या कामात भागीदारी करणे हे नियमबाहय आहे. अशाप्रकारच्या घटना आढळून आल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व नियंत्रण अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे नियमबाहय काम करतांना आढळल्यास कसुरदार अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करावी.
Mahavitaran:
PM KISAN : “पिएम किसान योजनेचा १६ वा हप्ता पहा कोणत्या बँकेत होणार जमा.”
Maharashtra State Electricity Distribution Company Limited; MSEDCL) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी Mahavitaran, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.
Mahavitaran :
मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. सध्या महावितरण १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो. महावितरणचे ७६,००० कर्मचारी आहेत.