शेतकऱ्यांना कधी मिळणार PM किसानचा 16 वा हफ्ता? या’ महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 16व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणआर आहे.
15 नोव्हेंबरला PM किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत.
फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 16 वा हप्ता मिळणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. विशेष म्हणजे हे रुपये प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान प्रकारांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत केंद्र सरकारनं PM किसानचे 15 हप्ते जारी केले आहेत. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. असे म्हटले जाते की केंद्र सरकार फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 16 वा हप्ता जारी करू शकते. जेणेकरुन शेतकरी पीएम किसानच्या रकमेसह पिकांची वेळेवर पेरणी करु शकतील.